Meet Our Clients  


Mr. Randhir Abhyankar Photo

श्री. रणधीर अभ्यंकर

नमस्कार,
           मी रणधीर अभ्यंकर, राहणार सोलापूर, मोबाईल नंबर - 8830387367. मी गेल्या 15 - 20 वर्षांपासून शैक्षणिक सल्लागार म्हणून व्यवसाय करीत आहे. तसेच, मी रंगभूमीशी निगडीत नाटककार, अभिनेता, दिग्दर्शक या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. गेल्या काही वर्षातील माझा हा प्रवास अतिशय उत्तमरित्या सुरू राहिलेला आहे. मी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्साहाने कामकाज करीत असतो. कामाच्या निमित्ताने आजपर्यंत अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे. तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याच्या निमित्ताने गेल्या काही वर्षात भारतभ्रमण केले आहे. सोलापूर, पूणे, मुंबई असा सातत्याने प्रवास होत राहिला आहे. अनेक वर्षांपासून स्वत: ड्रायव्हींग करीत वाहन चालवण्याची क्षमता सिघ्द केलेली आहे. अशा पघ्दतीने, उत्स्फुर्तपणे जीवन जगत असताना, अचानक सन 2021 च्या सुमारास माझ्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली.

Mr. Randhir Abhyankar Photo

           मी मुंबईमध्ये कामाच्या निमित्ताने चालत असताना, घाई-गडबडीत माझा डावा पाय एका पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये पडला. त्या खड्ड्याच्या खाली ड्रेनेजचे मेन होल होते, त्यामुळे माझा पाय वेडावाकडा झाला व पायाचा पंजा फ्रॅक्चर झाला. मुंबईमध्ये प्राथमिक उपचार करून, मी माझ्या घरी परत आल्यानंतर, ऑर्थोपेडीक सर्जन यांच्याकडून फ्रॅक्चरवर रीतसर उपचार सूरू केले परंतू, ऑक्टोबर 2021 च्या सुमारास माझ्या डाव्या पायाच्या तळव्यामधून प्रचंड वेदना होऊन, माझा पायाचा तळवा फाटला. त्यानंतर सोलापूर येथील 'ॲपेक्स' हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झालो. अनेक पघ्दतीच्या तपासण्या आणि एक्सपर्ट डॉक्टरांच्या चर्चेनुसार, डाव्या पायाच्या पिंडरीमध्ये जखम झालेली हाेती व जखम झालेल्या ठिकाणी विष तयार होऊन, तेथील हाडाला इन्फेक्शन झाले असल्याचे निष्पन्न करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हाडांचे इन्फेक्शन खूप सिरीयस असल्यामुळे, सदर इन्फेक्शन झालेला भाग पायापासून वेगळा करण्याचे त्यांनी सुचविले. सर्व एक्सपर्ट डॉक्टरांच्या मतानुसार, माझा डाव पाय गुडघ्याच्या खाली कापण्याचा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबर 2021 च्या पहिल्या आठवडयात सोलापूरातील एक्सपर्ट सर्जन डॉ. शरण हिरेमठ यांनी ऑपरेशन करून माझा डावा पाय कापून टाकला. त्यावेळेस अचानक झालेल्या या आघातामुळे मी पार हादरून गेलो. त्यानंतर अनेक इन्फेक्शनचा सामना करत, त्या जीवघेण्या उपचारातून मी सुदैवाने सुखरूप बाहेर आलो. कालांतराने पाय कापलेल्या भागाची जखम पूर्णपणे भरून आली. परंतु आयुष्यातील सगळ्यात मोठे चॅलेंज हे पुढेच होते. आजपर्यंत उत्स्फुर्तपणे जगलेला माणूस, त्याचा प्रवास अचानक थांबला होता. परंतु, मी मुळातच जिद्दी प्रवृत्तीचा असल्यामुळे, माझा अंतरात्मा मला काही स्वस्थ बसू देत नव्हता.

           अलीकडच्या काळामध्ये दिव्यांगजनांसाठी असलेल्या सोयीसुविधा, त्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगी असणारी साधने व उपकरणे, तंत्रशुध्द पध्दतीने बनविण्यात येतात, हे मी ऐकून होतो. पण शरीराने धडधाकट असणारा माणूस या गोष्टींच्या मुळाशी जात नाही. पण आता माझ्यावर ती वेळ आली होती, त्यामुळे मी कृत्रिम अवयवांच्या चिकित्सक अभ्यासाची मोहीम उघडलीच होती. त्या सर्व गोष्टींचा अभ्यास, रिसर्च व अशा सोयी पुरविणाऱ्या सेंटर्सची मी माहिती घेऊ लागलो.

           भारतातील मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, पुणे या मोठ्या शहरांमध्ये भेटी देऊन कृत्रिम पाय बनविणाऱ्या या विविध संस्थांमध्ये तंत्रशुध्द माहिती घेतली. भविष्यात यापुढे आपल्याला कृत्रिम पायावरच भक्कमपणे उभे राहायचे आहे व समर्थपणे आयुष्य पुढे चालवायचे आहे, या मताशी मी दृढ झालो.

           दुसऱ्या शहरांमध्ये जाऊन तेथे राहून कृत्रिम पाय तयार करुन घेणे व त्याव्दारे चलन-वलनाचा सराव करणे हे माझ्यासाठी खूप जिकीरीचे होते. मला आपल्या शहरामध्ये म्हणजेच सोलापूर शहरामध्ये कृत्रिम अवयव बनविणारे सेंटर का असू नये? हा प्रश्न मला सतावत होता आणि सतत या बाबत मी चौकशी केल्यानंतर मला एक दिवस श्री. बासूतकर यांचे "बासूतकरांचे पायोनिअर - प्रोस्थेटिक ॲन्ड ऑर्थोटिक सेंटर, साेलापूर" यांचा पत्ता मिळाला. आणि कुठलाही विलंब न करता मी लगेच त्यांच्या सेंटरला भेट दिली. तेथे श्री. उत्सव बासूतकर हे त्या सेंटरचे मालक यांना भेटलो. मी ज्या वेळी त्यांना भेटलो, त्यावेळी कृत्रिम पाय कसा असतो? याची मला थोडीफार माहिती झालेली होती. श्री. बासूतकर यांनी माझ्या पायाची तपासणी केली व मला त्यांनी उत्तम दर्जाचा कृत्रिम पाय बसवण्याबद्दल आश्वासित केले. सुदैवाने त्यांचे जुळे सोलापूर येथील सेंटर हे माझ्या घरापासून अवघ्या पाच मिनिटांवर आहे, ही बाब माझ्यासाठी अत्यंत सुखद होती. श्री. बासूतकर यांनी दुसऱ्यादिवशी मला अपॉइंटमेंट दिली व प्रोस्थेटिक (कृत्रिम अवयव) याबाबत संपूर्ण तपशीलवार माहिती दिली व मला वापरण्यास योग्य अशा कृत्रिम पायाचे माप घेऊन तसेच पायासाठी लागणारे इतर कंपोनेंट जसे लायनर, कार्बन फायबर रॉड, कार्बन फायबर फुट, लॉक व ॲडप्टर या उपकरणांची ऑर्डर दिली. कारण ही सर्व उपकरणे बाहेरील देशातून किंवा दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या ठिकाणाहून मागवावी लागतात आणि सर्व मटेरियल चे सॉकेट बरोबर फिटिंग केल्यानंतर एक संपूर्ण कृत्रिम पाय तयार होतो. सोलापूर शहरासारख्या रिमोट शहरांमध्ये वरील उपकरणे केवळ आणि केवळ बासुतकर यांच्या उत्तम नियोजन आणि संपर्कामुळे कमीत कमी वेळेत पोहोचण्याची खात्री आहे.

           अशा रीतीने बासूतकर यांचे "बासूतकरांचे पायोनिअर - प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स सेंटर, साेलापूर" येथील श्री. उत्सव बासुतकर यांनी अतिशय कमी कालावधीत मला उत्तम दर्जाचा प्रोस्थेसिस (कृत्रिम पाय) तयार करून पाच-सहा दिवसांची ट्रायल घेतली व मी माझ्या पायांवर पुन्हा खंबीरपणे, सक्षमपणे उभे राहण्याचे श्रेय श्री. बासुतकर यांना देणे क्रमप्राप्त आहे. पुढे येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचे काम श्री. बासुतकर यांनी चोखपणे बजावले. पुढे जाऊन नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तम दर्जाचे प्रोस्थेसिस बनवून देण्याचे काम श्री. बासुतकर यांनी केले. आज गेल्या दीड वर्षांमध्ये, मी या कृत्रिम पायावर खऱ्या पायाने जगण्याचा आनंद घेत आहे. भविष्यामध्ये, कोणाच्याही आयुष्यात शारीरिक अवयवांसंबंधी दुर्घटना घडल्यास आपण एक्सपर्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने श्री. बासुतकर यांचे "बासूतकरांचे पायोनिअर - प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स सेंटर"ला अवश्य भेट द्या. ते तुम्हाला उत्तम दिशा दाखवतील.

           धन्यवाद...🙏🏻🙏🏻🙏🏻






Mr. Ganesh Gund Photo

श्री. गणेश भीमराव गुंड

नमस्कार,
           मी गणेश भीमराव गुंड, जिल्हा परिषद सोलापूर मध्ये प्राथमिक शिक्षण म्हणून नोकरी करत आहे. मी वयाच्या चौथ्या वर्षापासून पोलिओ आजाराने त्रस्त आहे. माझ्या उजव्या पायात लहानपणापासून अजिबात ताकद नाही. जसा जसा मी मोठा होत गेलो, तसा तसा मला उभे राहता येत नव्हते. नंतर पुढे जाऊन मला गुडघ्यावर हात ठेऊन चालावे लागत होते. माझ्या गुडघ्यातील नसा आकुंचन पावल्यामुळे माझा पाय सरळ होत नव्हता. सन २००५ साली माझ्या पायाच्या गुडघ्याचे ऑपरेशन करून गुडघ्यातील नसा सरळ करण्याचा प्रसत्न केला व त्या कॅलिपरद्वारे चालण्याचा प्रयत्न करू लागलो. परंतु, ते लोखंडी कॅलिपर वापरताना मला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता व ते लोखंडी कॅलिपर पायाला टोचून असह्य वेदना होत होत्या. म्हणून, ते लोखंडी कॅलिपर वापरणे बंद केले व पुन्हा पूर्वीसारखे गुडघ्यावर हात टेकून चालू लागलो.

Mr. Ganesh Gund Photo            मी नोकरी करत असल्यामुळे शाळेला जाताना किंवा इतर कामे करत असताना, प्रवास करताना किंवा चालताना गुडघ्यावर हात टेकून चालावे लागत असल्यामुळे, एकूणच ही परिस्थिती खूपच त्रासदायक होती. त्या काळात, मी उत्तम दर्जाचा कॅलिपर कुठे बनवून मिळेल, याची वारंवार चौकशी करत होतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून सन 2022 ला सहजच जुळे सोलापूर येथील बासूतकर यांचे "बासूतकरांचे पायोनिअर - प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटीक्स सेंटर, साेलापूर" येथे भेट देऊन तेथील श्री. उत्सव बासुतकर यांना पायाची सविस्तर माहिती देऊन, त्यांनी माझ्या पायाची संपूर्ण तपासणी केली. संपूर्ण तपासणी अंती नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्तमरीत्या नवीन कॅलिपर असलेला ऑर्थोसिस बनवला जाऊ शकतो व त्याची किंमत अत्यंत माफक परवडेल याबाबत त्यांनी मला आश्वासित केले. माझ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून त्यांनी लवकरात लवकर नवीन कॅलिपर बनवून द्यायचे नियोजित केले. मी देखील त्वरित निर्णय घेऊन नवीन ऑर्थोसिस तयार करण्याबद्दल होकार दिला. त्यानंतर, अवघ्या दहा दिवसात श्री. बासुतकर यांनी "Automatic Knee Lock Mechanism Orthosis" चा पाय तयार करून दिला. या पायाची ट्रायल केल्यानंतर, आता मला या पायाचा चांगला सराव झालेला आहे व त्यामुळे माझे दैनंदिन जगणे सुसह्य झालेले आहे. सध्य स्थितीत, नवीन बसवलेल्या पायामुळे मला उठता येते, उभे राहता येते, व्यवस्थित चालता येते या सर्व गोष्टींचे श्रेय श्री. उत्सव बासुतकर व त्यांचे "पायोनिअर - प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटीक्स सेंटर" ला द्यायलाच पाहिजे.

           गेल्या दोन वर्षात, माझा या सेंटरशी संबंध आलेला आहे. एकंदरीत, या सेंटर मधील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे व उत्साहवर्धक आहे. तेथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला श्री. बासुतकर हे अत्यंत आदराने व विनम्रपणे सर्वांना सहकार्य करतात, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडी अडचणी व्यवस्थितपणे समजून घेतात व त्या सोडवण्याचा १००% प्रयत्न करतात. सोलापूर शहर व जिल्ह्यातील पायाच्या सर्व संबंधित असलेल्या विकलांगता यासाठी आपण निश्चितच बासुतकर यांच्या "बासूतकरांचे पायोनिअर - प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटीक्स सेंटर"ला नक्की भेट द्या व निश्चिंत रहा.

           धन्यवाद....🙏🏻🙏🏻🙏🏻






Mr. Dagadu Savane Photo

श्री. दगडू रंगनाथ सवणे

नमस्कार,
           मी श्री. दगडू रंगनाथ सवणे, वय ८०, राहणार येरमाळा, जिल्हा धाराशिव (उस्मानाबाद). मी पेशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होतो व नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो. सेवा निवृत्तीनंतर माझे आयुष्य अत्यंत आनंदाने व समाधानकारक जात होते. परंतु, वयाच्या अंतिम टप्प्यामध्ये मधुमेह या रोगाने मला जखडून टाकले. मी यासाठी योग्य ते उपचार घेऊन माझ्या जीवनशैलीत बदल करण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा, वयाच्या ८० व्या वर्षी या रोगाने मला खिंडीत गाठले. पायाला झालेल्या जखमांमुळे दोन्ही पायाला गँगरीन होऊन सन २०२१ ते २०२३ या कालावधीत कालांतराने प्रथम उजवा पाय व नंतर डावा पाय गुडघ्याच्या खाली कापावे लागले.

Mr. Dagadu Savane Photo            आपल्या शत्रुच्याबाबतीही अशी दुर्दैवी घटना घडू नये. परंतु, ती वेळ आयुष्याच्या सरते शेवटी माझ्यावर येऊन ठेपली आणि त्यानंतर दोन्ही पाय नसल्यामुळे व्हील चेअरवरून माझा प्रवास सुरू झाला. आयुष्यभर या दोन्ही पायांनी शिक्षण क्षेत्रातील 'शिकवण्याचे' पवित्र काम केले. शेतकरी म्हणून जमीन कसली. परंतु, आता मात्र परावलंबी जीवन जगणे सुरू झाले. माझी खूप दयनीय अवस्था झालेली आहे. मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वत:हून जाता येत नाही, अशा अवस्थेत आणि वयोवृद्धत्वामूळे माझे जगणे मुश्कील झाले आहे. त्यातुनच मधुमेहामुळे माझी दृष्टीही अंधूक झालेली आहे. या संपूर्ण परिस्थितीत माझी अवस्था एका जिवंत दगडासारखी झालेली आहे.

           नवीन तंत्रज्ञानामुळे कृत्रिम पाय बसविले जातात ही वार्ता माझ्या कानावर येऊन पडली आणि माझ्या मनामध्ये एक छोटासा आशेचा किरण जागृत झाला. माझ्या मुलांनी आणि नातवांनी यासाठी अभ्यास करून निरनिराळ्या ठिकाणी जाऊन कृत्रिम पायाबद्दल चौकशी केली व सोलापूर येथील "बासूतकर यांचे पायोनिअर - प्रोस्थेटिक ॲन्ड ऑर्थोटिक सेंटर, साेलापूर" याबाबत माहिती मिळाली. फोन वरून चौकशी केल्यानंतर श्री. उत्सव बासूतकर हे या सेंटरचे व्यवस्थापक व मार्गदर्शक त्यांनी कृत्रिम पाय बसविण्याच्या पद्धतीबाबत अतिशय उत्तमरित्या माहिती दिली व मार्गदर्शन केले. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी श्री. बासूतकर यांनी अपॉइंटमेंट देऊन त्या दिवशी येरमाळा येथून सोलापूर हा प्रवास करून मी माझ्या नातवासह श्री. बासूतकर यांच्या जुळे सोलापूर येथील सेंटर ला भेट दिली. श्री. बासूतकर यांनी कृत्रिम पाय बसविण्यासाठी लागणारे विविध स्पेअर्स व त्यांच्या किमतीबाबत योग्य ती माहिती दिली. त्यांनी सांगितलेल्या कंपोनेंटची अत्यंत माफक दराबद्दल माहिती दिली व दोन्ही पायांसाठी नवीन कृत्रिम पाय बसविण्याचे निश्चित केले आणि त्याच दिवशी श्री. बासूतकर यांनी कृत्रिम पाय बनविण्यासाठी दोन्ही पायाचे माप घेतले. साधारण १०-१५ दिवसांनंतर दोन्ही पाय तयार करून त्याचे फिटिंग व ट्रायल घेण्यासाठी संपर्क करण्यात येईल असे कळविले.

           त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२४ रोजी माझ्या दोन्ही पायाचे फिटिंग आणि ट्रायल घेण्यात आली. दोन्ही कृत्रिम पायांवर चालताना मला माझ्या उर्वरित आयुष्यातील तेजस्वी प्रकाश जाणवला आणि व्हील चेअरवरून उतरून त्या दोन्ही कृत्रिम पायांनी वॉकरच्या सहाय्याने चालताना मला माझ्या ८० व्या वर्षी एखाद्या लहान मुलाला आनंद व्हावा त्यापद्धतीने मी खूप आनंदी झालो आणि मी श्री. उत्सव बासूतकर सरांचे खूप खूप आभार मानले. एखाद्या देवदूताला भेटल्याचा जसा अनुभव यावा, तसा आनंद "बासूतकर यांचे पायोनिअर - प्रोस्थेटिक ॲन्ट ऑर्थोटिक सेंटरचे" श्री. उत्सव बासूतकर यांना भेटून झाला. भविष्यामध्ये, माझे उर्वरित आयुष्य श्री. उत्सव बासूतकर यांच्या मार्गदर्शनाखली आनंदाने जाईल अशी माझी अपेक्षा आहे.

           धन्यवाद....🙏🏻🙏🏻🙏🏻